टोमॅटोच्या पिकातून केली लाखोंची कमाई
अमोल हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टोमॅटोची शेती करत आहेत. या वर्षी देखील त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची चांगली मशागत करून घेतली. जमिनीची मशागत केल्यानंतर शेणखत आणि कंपोस्ट खत टाकून, मल्चिंग पेपर अंथरूण त्यांनी टोमॅटो लागवड केली. लागवडीसाठी टोमॅटोच्या अथर्व या जातीची निवड केली.त्यामुळे अमोल यांना टोमॅटो पिकातून चांगले उत्पादन मिळाले आहे. आतापर्यंत त्यांनी टोमॅटोचे आठ ते दहा तोडे घेतले आहेत. विशेष म्हणजे आणखी काही दिवस त्यांना टोमॅटोचे उत्पादन मिळणार आहे. पंधरा ते वीस रुपये किलो या दराने सध्या टोमॅटोची विक्री होत असून आत्तापर्यंत त्यांना चांगले उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच पुढे जाऊन जवळपास पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा अमोल यांनी व्यक्त केली आहे.

याआधी मिळाले होते २५ लाखांपर्यंतचे उत्पन्न
अमोल यांनी गेल्या वेळी टोमॅटोची दोन एकरात लागवड केली होती. आणि यातून त्यांना २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे, निश्चितच शेतीमध्ये सातत्य ठेवले तर लाखो रुपयांची कमाई करता येणे शक्य आहे हे अमोल देसाई यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.