Live Marathi https://livemarathi.krushinews.in/ Mon, 27 May 2024 11:20:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 ‘लाल’ सोन्याने केलं मालामाल, उच्चशिक्षित तरुणाने टोमॅटो शेतीतून केली लाखोंची कमाई https://livemarathi.krushinews.in/tomato/ https://livemarathi.krushinews.in/tomato/#respond Mon, 27 May 2024 11:18:40 +0000 https://livemarathi.krushinews.in/?p=69         आष्टा : ‘शेती’ या क्षेत्राबद्दल सध्याच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. खुद्द आई वडीलच त्यांना शेतीकडे न वळण्याचा सल्ला देत असतात. याच कारण म्हणजे पिकांसाठी पाण्याची कमतरता, बदलते हवामान आणि शेतीतून होणारा आर्थिक तोटा. परंतु आता तरुणांच्या मनातून शेतीबद्दलची नाकारात्मकता दूर होत चालली आहे. शेतीमध्ये उच्च स्तराचे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक ... Read more

The post ‘लाल’ सोन्याने केलं मालामाल, उच्चशिक्षित तरुणाने टोमॅटो शेतीतून केली लाखोंची कमाई appeared first on Live Marathi.

]]>
 

 

 

 

आष्टा : ‘शेती’ या क्षेत्राबद्दल सध्याच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. खुद्द आई वडीलच त्यांना शेतीकडे न वळण्याचा सल्ला देत असतात. याच कारण म्हणजे पिकांसाठी पाण्याची कमतरता, बदलते हवामान आणि शेतीतून होणारा आर्थिक तोटा. परंतु आता तरुणांच्या मनातून शेतीबद्दलची नाकारात्मकता दूर होत चालली आहे. शेतीमध्ये उच्च स्तराचे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक तरुण शेतकरी वैशिष्ट्येपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने शेती करताना दिसून येत आहेत. व प्रतिकूल आणि नैसर्गिक परिस्थितीचा फायदा घेत शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे. अशातच आष्टा येथील एका उच्च शिक्षित तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टोमॅटोची शेती केली. आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

नोकरी न करता शेती केली
आष्टा येथील अमोल लालासाहेब देसाई हे एक उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी आहेत. अमोल यांनी पारंपारिक पिकांची लागवड करण्याऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजीपाला शेती कशा तऱ्हेने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते हे अमोल यांनी दाखवून दिले आहे. अमोल देसाई हे पदवीधर तरुण आहेत. मात्र पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही त्यांनी नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य दाखवले आहे. त्यांच्याकडे चार एकर जमीन असून या चार एकर जमिनीत त्यांनी सध्या विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या अमोल यांनी एक एकरात ऊस, २ एकरात काकडी, सव्वा एकरात केळी, ३० गुंठ्यात टोमॅटो आणि उर्वरित जमिनीवर कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली आहे.अधिक माहिती……….. 

 

The post ‘लाल’ सोन्याने केलं मालामाल, उच्चशिक्षित तरुणाने टोमॅटो शेतीतून केली लाखोंची कमाई appeared first on Live Marathi.

]]>
https://livemarathi.krushinews.in/tomato/feed/ 0 69
PM Kisan 17th Installment : तुमचे तर नाव नाही ना झाले पीएम किसानच्या यादीतून गायब, असे करा चेक झटपट https://livemarathi.krushinews.in/pm-kisan-yojana/ https://livemarathi.krushinews.in/pm-kisan-yojana/#respond Sun, 05 May 2024 07:47:20 +0000 https://livemarathi.krushinews.in/?p=40       पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. पण त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासली का? या यादीत तुमचे नाव आहे की नाही, कसं माहिती करुन घेणार, या पद्धतीने तुम्हाला तपासाता येईल तुमचे नाव यादीत आहे की नाही ते… PM Kisan Yojana मध्ये नाव कपात होण्याची ही कारणे आहेत. 1. लाभार्थ्यांची ... Read more

The post PM Kisan 17th Installment : तुमचे तर नाव नाही ना झाले पीएम किसानच्या यादीतून गायब, असे करा चेक झटपट appeared first on Live Marathi.

]]>
 

Pradhansamman nidhi

 

 

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. पण त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासली का? या यादीत तुमचे नाव आहे की नाही, कसं माहिती करुन घेणार, या पद्धतीने तुम्हाला तपासाता येईल तुमचे नाव यादीत आहे की नाही ते…

PM Kisan Yojana मध्ये नाव कपात होण्याची ही कारणे आहेत. 1. लाभार्थ्यांची बँकेची चुकीची माहिती 2.चुकीचा Bank Account Number देणे 3.नियमात बसत नसल्यास 4.आधार कार्ड बँक खात्यास जोडलेले नसल्यास 5. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास 6. पीएम किसान ekyc केले नसल्यास

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा. या ठिकाणी उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय निवडा. Beneficiary Status हा पर्याय निवडा. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा, माहिती जमा करा.खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळेल. अथवा Know Your Status हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा.

Know Your Status हा पर्याय निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक नोंदवा. Captcha निवडा. मोबाईलवरील ओटीपी टाका. त्याआधारे आता तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती होईल. त्यानंतर होमवर जाऊन Know Your Status वर क्लिक करा. पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.

त्यानंतर उजव्या बाजूला Beneficiary List चा पर्याय निवडा. राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे निवडा. त्यानंतर Get Report चा पर्याय निवडा. आता तुमच्या समोर संपूर्ण गावातील Beneficiary List येईल. त्यात तुमचे नाव शोधा.

तुमचे यादीत नांव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

The post PM Kisan 17th Installment : तुमचे तर नाव नाही ना झाले पीएम किसानच्या यादीतून गायब, असे करा चेक झटपट appeared first on Live Marathi.

]]>
https://livemarathi.krushinews.in/pm-kisan-yojana/feed/ 0 40
कांद्याची निर्यातबंदी उठवताच दरात वाढ, लासलगाव बाजारात… https://livemarathi.krushinews.in/onion-price/ https://livemarathi.krushinews.in/onion-price/#respond Sat, 04 May 2024 08:27:22 +0000 https://livemarathi.krushinews.in/?p=34       सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता निर्यातबंदी उठवली आहे. यामुळे कुठे कांदा निर्यात करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात या निर्णयाचे स्वागत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पापूर्वी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने ... Read more

The post कांद्याची निर्यातबंदी उठवताच दरात वाढ, लासलगाव बाजारात… appeared first on Live Marathi.

]]>
 

onion

 

 

सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता निर्यातबंदी उठवली आहे. यामुळे कुठे कांदा निर्यात करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात या निर्णयाचे स्वागत करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पापूर्वी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज होते. नाशिक जिल्ह्यात हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. तसेच 31 मार्च 2025 पर्यंत देशी चण्याच्या आयातीवर शुल्कात सूट दिली आहे. हे बदल 4 मे पासून लागू होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

असा होता केंद्राचा निर्णय
सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता निर्यातबंदी उठवली आहे. यामुळे कुठे कांदा निर्यात करता येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले होते.

कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. आता चार महिने 27 दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता 40 टक्के ड्युटी व 550 डॉलर प्रति मेट्रिक टन शुल्क देत करता येईल विदेशात व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. या निर्णयामुळे मिळणार महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी केली होती. त्यानंतर ही बंदी मार्च 2024 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही बंदी वाढवली. देशातील बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले होते. यामुळे ग्राहक नाराज होईल. यामुळे कांदा निर्यात बंदी करण्यात आली.

आठ दिवसांपूर्वी सहा देशांत परवानगी
केंद्र सरकारने आठ दिवसांपूर्वी ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती. तसेच गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. परंतु कांद्याची ही निर्यात फक्त बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांपुरती होती. परंतु आता सरसकट बंदी मागे घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकमधील शेतकरी चांगलेच आक्रमक होते. निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनीही प्रयत्न केले होते.

भारती पवार यांनी मानले आभार
केंद्रीय मंत्री भारत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, यासाठी महायुतीतील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे आणि सर्व देशांसाठी खुली केलीय.

कांदा दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

The post कांद्याची निर्यातबंदी उठवताच दरात वाढ, लासलगाव बाजारात… appeared first on Live Marathi.

]]>
https://livemarathi.krushinews.in/onion-price/feed/ 0 34
लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा, सहा देशांत कांदा निर्यातीस परवानगी https://livemarathi.krushinews.in/onion/ https://livemarathi.krushinews.in/onion/#respond Fri, 03 May 2024 07:24:34 +0000 https://livemarathi.krushinews.in/?p=27       गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरुन केंद्र सरकारवर टीका सुरु आहे. परंतु आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांमध्ये कांदा निर्यात केली जाणार आहे. एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून ... Read more

The post लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा, सहा देशांत कांदा निर्यातीस परवानगी appeared first on Live Marathi.

]]>
 

 

 

गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरुन केंद्र सरकारवर टीका सुरु आहे. परंतु आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस सहा देशांमध्ये कांदा निर्यात केली जाणार आहे. एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांची होती मागणी
केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातबंदी मागील वर्षी केली होती. सुरुवातीला ही निर्यात बंदी मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यातबंदी वाढवली. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलने केली. देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होत असलेल्या नाशिकमध्ये शेतकरी वारंवार कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत होते.

पांढऱ्या कांद्यास दिली परवानगी
शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही सरकारकडून निर्यातबंदी मागे घेतली जात नव्हती. त्यानंतर गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची बातमी आली. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दोन हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी निर्णय न घेता सरसकट कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी होऊ लागली. अखेर केंद्र शासनाने ही मागणी मान्य करत एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली.

अशी होणार निर्यात
सहा देशांमध्ये कांदा निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत करण्यात येणार आहे. एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशातील शेतकऱ्यांकडून कांदा घेणार आहे. एनसीईएल त्यासाठी 100 टक्के आगाऊ पेमेंट देणार आहे. सध्या असलेल्या बाजारभावानुसार हा कांदा घेतला जाणार आहे. ९९ हजार १५० मेट्रीक टन कांद्यासह दोन हजार मेट्रीक टन कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट बंदी मागे घेण्याची मागणी
केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र सरसकट निर्यात बंदी मागे घेतील अशी अपेक्षा होती. यासोबतच सरकारने कांद्याची खरेदी करताना एजन्सी मार्फत न करता थेट बाजारांमधून करावी, अशी शेतकरी यांची मागणी आहे.

The post लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा, सहा देशांत कांदा निर्यातीस परवानगी appeared first on Live Marathi.

]]>
https://livemarathi.krushinews.in/onion/feed/ 0 27
Hello world! https://livemarathi.krushinews.in/hello-world/ https://livemarathi.krushinews.in/hello-world/#comments Thu, 18 Apr 2024 16:53:36 +0000 https://livemarathi.krushinews.in/?p=1 Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Live Marathi.

]]>
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Live Marathi.

]]>
https://livemarathi.krushinews.in/hello-world/feed/ 1 1