PM Kisan 17th Installment : तुमचे तर नाव नाही ना झाले पीएम किसानच्या यादीतून गायब, असे करा चेक झटपट

 

Pradhansamman nidhi

 

 

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. पण त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासली का? या यादीत तुमचे नाव आहे की नाही, कसं माहिती करुन घेणार, या पद्धतीने तुम्हाला तपासाता येईल तुमचे नाव यादीत आहे की नाही ते…

PM Kisan Yojana मध्ये नाव कपात होण्याची ही कारणे आहेत. 1. लाभार्थ्यांची बँकेची चुकीची माहिती 2.चुकीचा Bank Account Number देणे 3.नियमात बसत नसल्यास 4.आधार कार्ड बँक खात्यास जोडलेले नसल्यास 5. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास 6. पीएम किसान ekyc केले नसल्यास

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा. या ठिकाणी उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय निवडा. Beneficiary Status हा पर्याय निवडा. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा, माहिती जमा करा.खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळेल. अथवा Know Your Status हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा.

Know Your Status हा पर्याय निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक नोंदवा. Captcha निवडा. मोबाईलवरील ओटीपी टाका. त्याआधारे आता तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती होईल. त्यानंतर होमवर जाऊन Know Your Status वर क्लिक करा. पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.

त्यानंतर उजव्या बाजूला Beneficiary List चा पर्याय निवडा. राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे निवडा. त्यानंतर Get Report चा पर्याय निवडा. आता तुमच्या समोर संपूर्ण गावातील Beneficiary List येईल. त्यात तुमचे नाव शोधा.

तुमचे यादीत नांव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment