PM KISAN YOJONA

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी लागेल. पोर्टल उघडताच तुम्हाला Farmer Corner मध्ये नवीन नाव नोंदणी हा पर्याय दिसेल.

आता आणखी एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती, तपशील नोंदवा. ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर एक कॅप्चा कोड दिसेल. तो नोंदवा.

आता OTP बटणवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो नोंदवा. ओटीपी नोंदविल्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.

या नवीन पेजवर तुम्हाला विचारलेली इतर माहिती, तपशील नोंदवा. त्यानंतर अत्यावश्यक दस्तावेजची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि ही माहिती सेव्ह करा. या प्रक्रियेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.