‘लाल’ सोन्याने केलं मालामाल, उच्चशिक्षित तरुणाने टोमॅटो शेतीतून केली लाखोंची कमाई

 

 

 

 

आष्टा : ‘शेती’ या क्षेत्राबद्दल सध्याच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. खुद्द आई वडीलच त्यांना शेतीकडे न वळण्याचा सल्ला देत असतात. याच कारण म्हणजे पिकांसाठी पाण्याची कमतरता, बदलते हवामान आणि शेतीतून होणारा आर्थिक तोटा. परंतु आता तरुणांच्या मनातून शेतीबद्दलची नाकारात्मकता दूर होत चालली आहे. शेतीमध्ये उच्च स्तराचे तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक तरुण शेतकरी वैशिष्ट्येपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने शेती करताना दिसून येत आहेत. व प्रतिकूल आणि नैसर्गिक परिस्थितीचा फायदा घेत शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे. अशातच आष्टा येथील एका उच्च शिक्षित तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टोमॅटोची शेती केली. आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

नोकरी न करता शेती केली
आष्टा येथील अमोल लालासाहेब देसाई हे एक उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी आहेत. अमोल यांनी पारंपारिक पिकांची लागवड करण्याऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजीपाला शेती कशा तऱ्हेने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते हे अमोल यांनी दाखवून दिले आहे. अमोल देसाई हे पदवीधर तरुण आहेत. मात्र पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही त्यांनी नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य दाखवले आहे. त्यांच्याकडे चार एकर जमीन असून या चार एकर जमिनीत त्यांनी सध्या विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या अमोल यांनी एक एकरात ऊस, २ एकरात काकडी, सव्वा एकरात केळी, ३० गुंठ्यात टोमॅटो आणि उर्वरित जमिनीवर कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली आहे.अधिक माहिती……….. 

 

Leave a Comment